जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यासह कार्यकर्ते आणि महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी जमावावर पोलीसांचा लाठीमार केला. लाठी चार्ज करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी केली आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून अहवालानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.