भारताच्या टी 20 विश्वचषक जिंकल्यानंतर सांगलीच्या मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार करण्यात आला. मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये जल्लोष करण्यासाठी नागरिक जमले होते. यावेळी जल्लोषादरम्यान काही जणांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पिटाळून लावले. जल्लोष करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. परंतु काही जणांच्या हुल्लबाजीमुळे गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावयास लागला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.