नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आलेल्या समक्ष ताटे याच्या कुटुंबाला आणि त्याची प्रेयसी आंचल मामीडवार हिला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. सक्षम ताटे याच्या संघसेननगर येथील निवासस्थानी दोन शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. 27 नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आँचलचे वडील, दोन्ही भाऊ आणि अन्य तीन आरोपी अटक आहेत. दोघे फरार आहेत.