माझ्या पराभवाला महायुतीचे नेते जबाबदार असून त्यांनी माझा घात केला आहे, असा आरोप दराडेंनी केला. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.