नवी मुंबईच्या जुहूगावमध्ये एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची खबर मिळताच नवी मुंबई पोलिसांनी (गुन्हे शाखा) मसाज सेंटरवर धाड टाकली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या 6 महिलांची सुटका केली.