जळगाव जिल्ह्यातील ३५ गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या जलस्त्रोतांचे सर्वेक्षण करून पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली.