आरबीआयच्या अहवालानुसार, वायू प्रदूषण, दूषित पाणी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे काही राज्यांमध्ये आयुर्मान घटले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सर्वाधिक घट नोंदवली गेली असून, अनुक्रमे १.७ आणि २ वर्षांनी सरासरी आयुर्मान कमी झाले आहे. तर, उत्तम आरोग्य सुविधा असलेल्या राज्यांमध्ये आयुर्मानात वाढ झाली आहे. शिकागो युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, प्रदूषणाने सरासरी आयुर्मान ३.५ वर्षांपर्यंत कमी होऊ शकते.