पुणे : आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात डाळिंब उत्पादक शेतकरी बाळू बबन लोखंडे यांच्या डाळिंबाच्या शेतातील सुमारे १२५ क्रेट डाळिंबाच्या फळांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केलीय. त्यामुळे शेतकरी बाळू लोखंडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.