जळगाव शहरातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे चिमुकल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनांना तसेच विद्यार्थ्यांच्या अपघाताचा देखील मोठा धोका आहे. स्मशानभूमीकडे येणाऱ्या वेगवेगळ्या तिन्ही मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून याचा या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना जाग न आल्याने स्कूल बस चालकांनी स्वतःच पुढाकार घेऊन हे खड्डे बुजवण्याची मोहिम हाती घेतली आहे.