आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या वादळानंतर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) सक्रिय झाले आहे. एफडीएचे अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले असून, त्यांनी कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची कसून तपासणी सुरू केली.आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आणि मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, आता कॅन्टीनच्या अन्नसुरक्षेची पोलखोल होणार आहे.