जालना जिल्ह्यातल्या भोकरदन नगर परिषदेच्या दोन जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे मतदान प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक एक (ब) मधील 1875 मतदारांपैकी 9 वाजेपर्यंत केवळ 32 मतदारांनीच बजावला हक्क आहे. प्रभाग क्रमांक 1(अ) आणि 9 (ब) या दोन जागेसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. भोकरदन नगरपालिकेच्या दोन जागेसाठी एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.