अमरावती जिल्ह्यातील कित्येक गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी रस्ता सुरळीत नसल्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा, यासह विविध गावांमध्ये शेतकऱ्यांना पांदण रस्ते नसल्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी मोठी अडचण होत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन शेतकऱ्यांना पांदन रस्ते तात्काळ करून द्यावे अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने केली जात आहे.