परभणी जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून वातावरणातील गारवा कमी झाला असून, भल्या पहाटे पासून धुक्याची चादर पसरू लागली आहे, नागरिकांना उशिरापर्यंत अंधारातून वाट काढावी लागत आहे , या धुक्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे अशा रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.