पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अज्ञात व्यक्तीकडून पोस्टर लावण्यात आले आहे. यावर दाराला नीट कडी लावा! रात्री हाकामारी येणार आहे, असा आशय लिहिण्यात आला आहे. बस स्टॉप आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावल्याने चर्चेचा विषय ठरतोय.