कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोस्टर वॉर रंगले आहे.पोस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीला महायुतीचा प्रत्युत्तर समोर आले आहे.काँग्रेसच्या कोल्हापूर कस्सं तुम्ही म्हणशीला तस्सं या टॅगलाईनला महायुतीचं जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सत्ता असताना भरलं खीसं आता म्हणताय कोल्हापूर कसं ? कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराजवळ बॅनर्स झळकले आहे.