गोवा महामार्गावरील लोणेरे उड्डाणपुलावर सध्या अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपुलावर मोठा खड्डा पडला असून त्या खड्ड्यातील लोखंडी सळ्या स्पष्टपणे दिसत आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा गंभीर धोका ठरू शकतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताची शक्यता अधिक असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.