परभणी नांदेड जाणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठंमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने छोट्या वाहनधारकांना नुकसानीचा सामना देखील करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.