मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाका आणि सर्व्हिस रोडवर सध्या मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा द्यावा,अशी मागणी होत आहे.