ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे–दिघी माणगाव चव्हाणवाडी महामार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा महामार्ग असतानाही रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.