नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर परिसरात ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहे. दररोज लाखो रुपयांचा टोल भरूनही वाहनधारकांना खड्डेमुक्त रस्त्याची कोणतीही सुविधा मिळत नाही. खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी घसरणे आणि भीषण अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारकांना रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.