अंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील तिकिट काऊंटरसमोर जाणाऱ्या आंबिवली-टिटवाळा मार्गावरील मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, रिक्षाचालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. पावसाचं पाणी साचून खड्ड्यांचं डबक्यांमध्ये रूपांतर झाल्याने स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे.