राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची खड्ड्यांमुळे मोठी दुरावस्था झाली असून या मार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळी पर्यटनासाठी हजारो पर्यटक या भागात दाखल होत असताना, खड्डे चुकवताना वाहने घसरून अपघातांचे प्रमाण वेगाने वाढत आहे.