नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव समोर आला असून, H5N1 विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. तिसऱ्यांदा हा संसर्ग आढळल्याने कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या कोंबड्यांमध्ये H5N1 ची लागण झालेली असताना प्रतिबंधासाठी H9N2 ही लस देण्यात आली आहे.