धाराशिव तालुक्यातील तडवळे गावात महावितरणच्या कारभाराविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलं.