प्रताप सरनाईक यांनी कॅश बॉम्ब व्हिडीओला फुसका बार म्हणत अंबादास दानवेंवर टीका केली आहे. या व्हिडीओचा महेंद्र दळवींशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दानवे केवळ प्रसिद्धीसाठी ट्वीट करत असून, लाल टी-शर्टमधील व्यक्ती त्यांचाच पदाधिकारी असण्याची शक्यता सरनाईक यांनी वर्तवली. पोलीस चौकशीनंतर सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले.