केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे जिजाऊंना अभिवादन केले. त्यांनी जिजाऊ भक्तांना शुभेच्छा देत, सिंदखेड राजाचा विकास आराखडा लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. बुलढाणा जिल्ह्यातील या ऐतिहासिक स्थळाच्या पर्यटन विकासासाठी शासनाचे सहकार्य मिळेल असेही त्यांनी नमूद केले.