आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात मोठ्या मेहनतीनं आणि लाखो रुपयांचा खर्च करून उभी केलेली केळीची बाग काही मिनिटांच्या वादळात जमीनदोस्त झालीय. हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत.