नाशिक शहरात आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते, त्यानंतर दुपारी पावसाच्या सरी कोसळल्या.