सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भीमाशंकरच्या पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पेरणी केलेल्या भात पिकांना मोठे जीवदान मिळाले असून आदिवासी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या सरींमुळे दिलासा मिळाला आहे.