कोल्हापूरच्या वारणानगर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, तसेच या पावसामुळे आता शेतीच्या मशागतीच्या कामांना देखील वेग येणार आहे.