धाराशिवमधील उमरग्यात मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उमरगा शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक वातावरणामध्ये बदल झाल्याने मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. पावसामुळे तापमानात मोठी घट झाली असून गेल्या काही दिवसांच्या प्रचंड उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.