नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया झाली असून रात्री उशिरा मत पेट्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. आज मतमोजणी होती मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार असल्याने 21 डिसेंबर पर्यंत आता मत पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये पोलिसांच्या कडक बंदोबस्त राहणार आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे स्ट्रॉंग रूमच्या परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती येणार नाही यासाठी पूर्णतः काळजी घेतली जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेमध्ये सरासरी 69 टक्के मतदान झालेलं आहे.