नंदूरबार : तळोदा तालुक्यातील निझरी नदीवरील पूल अपूर्ण असल्याने, गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून नदी पार करवी लागली. सातपुड्यातील विदारक वास्तव पुन्हा समोर आले आहे. टाकली गावाला लगत असलेल्या निझरी नदीवरील पुलाअभावी गर्भवती महिलेचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने नातेवाईकांच्या मदतीने गर्भवतीची सुखरूप प्रसूती झाली आहे. आई आणि कन्या दोघीही सुरक्षित आहेत.