जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या पालखी सोहळ्याची तयारी देहूत सुरू झाली असून यंदा तुकोबांची पालखी नव्याने तयार करण्यात येणार असलेल्या भव्य रथात विराजमान होणार आहे. 7 जुलै रोजी देहूतून पालखीचे प्रस्थान होणार असून त्यासाठी विशेष रथाची निर्मिती करण्यात येणार आहे.