बैल पोळा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मातीचे बैल बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. धुळे शहरात कुंभारवाड्यात पारंपारिक मातीच्या बैलांसोबतच पीओपीपासून बैल बनविले जातात.कच्चा मालाच्या किमती महागल्याने यंदा दहा ते वीस टक्क्यांनी किंमत वाढणार आहे. 30 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत यास पैसे मोजावे लागणार आहे.