राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच वर्धा येथील महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बापूकुटी, बा-कुटी आणि बापूंच्या कार्यालयाची पाहणी केली. सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांनी राष्ट्रपतींना आश्रमाच्या कार्याची आणि इतिहासाची सविस्तर माहिती दिली.