इगतपुरी शहराची मानाची साई पालखी म्हणून प्रसिद्ध असणारी श्री साई सहाय्य समितीची साई पालखी आज इगतपुरीहून शिर्डीकडे प्रस्थान झाली. खालची पेठ महादेव मंदिरात पालखीची पूजा आणि महाआरती करण्यात आली. ढोल ताशाच्या आणि डीजेच्या गजरात साई पालखीचं प्रस्थान झालं. या साई पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केले तर वारकरी संप्रदायाच्या विद्यार्थ्यांनी छोटेखानी रिंगण केला.