पंतप्रधानांसाठी जेवण बनवणं हे केवळ स्वयंपाक नव्हे, तर देशाच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी जबाबदारी आहे. त्यांच्या कुकची निवड सामान्य नसते. भारत सरकारच्या खास विभागांमधील अनुभवी कर्मचारीच यासाठी पात्र ठरतात. त्यांची निष्ठा, अनुभव आणि पार्श्वभूमीची कठोर चौकशी करूनच त्यांची नियुक्ती होते.