पंतप्रधानांच्या कुककडून केवळ चविष्ट जेवण अपेक्षित नसते, तर त्यांना उच्च स्वच्छता, आरोग्य सुरक्षा आणि कठोर नियमांचे पालन करावे लागते. भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे, कारण ते परदेशी पाहुण्यांनाही सेवा देतात. कोणतीही विशिष्ट पदवी बंधनकारक नसली तरी, हॉटेल मॅनेजमेंटचा अनुभव आणि कौशल्ये महत्त्वपूर्ण ठरतात.