बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील एका खाजगी डॉक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी या गुंडावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यानुसार तो बुलढाणा कारागृहात बंदी होता. मात्र कारागृहातून सुटताच या गुंडाची त्याच्या साथीदारांनी बुलढाणा शहरातून मिरवणूक काढत त्याचा सत्कार केला.