भंडारा जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली आहे. मात्र शासकीय धान खरेदी सुरू असतानाच अनेक खरेदी केंद्रांवर चालकांची खरेदी मर्यादा (लिमिट) संपल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी धान खरेदी ठप्प झाली असून शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तयार धान पडून असल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकरी विवंचनेत सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने मर्यादा वाढवून खरेदी सुरू करावी, अशी मागणी धान खरेदी केंद्र चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेपाल रंगारी यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.