पुण्यातील विमानतळ आणि बाणेर या ठिकाणी सुरू असलेल्या दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी करून तब्बल 18 मुलींची सुटका केली आहे. यामध्ये विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या स्पा सेंटर मधून 16 मुली तर बाणेर पोलीस ठाण्याच्या आधी सुरू असलेल्या स्पा सेंटर मधून दोन अशा एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली. या अठरा मुलींपैकी बहुतांश मुली या थाई नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे स्पा चालक आणि मॅनेजर आणि त्यापुढे त्यांचे असलेले धागेदोरे यांच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस उपयुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे.