वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या निवासस्थान असलेल्या सेवाग्राम आश्रम परिसरातील बापु कुटीच्या पावसाळ्यात भिंतीला पाणी लागून त्या खराब होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.येथे पारंपरिक पद्धतीने शिंदोळ्याच्या झाडाच्या पानोळ्यापासून तयार केलेल्या ताटव्यांच आच्छादन टाकण्यात आले आहे. सेवाग्राम आश्रम परिसरात बा कुटी, बापू कुटी, आदी निवास आदींच्या भिंतीना पावसाळ्यात दरवर्षी संरक्षणासाठी पारंपरीक पद्धतीच्या उपाययोजना केल्या जातात. यावर्षी देखील पावसाच्या अगोदर सेवाग्राम आश्रम परिसरातील कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी ताटव्या लावण्यात आल्या आहेत. या ताटव्या तयार करण्यासाठी शिंदोळ्याच्या झाडाच्या पानोळ्या, वेळू, दोरी, काड्याचा वापर केला गेला आहे.