प्रोटीन हे स्नायू, त्वचा आणि केसांसाठी महत्त्वाचे पोषणतत्व आहे. प्रत्येकासाठी आवश्यक असलेले प्रोटीन नैसर्गिक आहारातून घेणे उत्तम. मात्र, मांसाहार न करणाऱ्यांसाठी, लॅक्टोज इनटॉलरन्स असलेल्यांसाठी किंवा नवशिक्यांसाठी प्रोटीन सप्लिमेंट उपयुक्त ठरू शकते. अंड्याचा पांढरा भाग, मासे आणि चिकन हे प्रोटीनचे उत्कृष्ट नैसर्गिक स्रोत आहेत.