निवडणुकीत आरक्षण टाकायचं अनुसूचित जमातीचे आणि सर्व कोळी जमातीला मात्र दाखले, सवलती द्यायचे नाही ही दुटप्पी भूमिका राज्य शासनाने घेतलीय. यावर सकारात्मक भूमिका महिन्याभरात घेतले नाहीतर शिरोळ तालुक्यातून तीव्र आंदोलनाची ठिणगी पडेल, असा खणखणीत इशारा कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष विजय भोजे यांनी सोमवारी शिरोळ तहसील कार्यालयात दिला तर नागपुरात कोळी समाजावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध व्यक्त केले.