भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहरात 6 डिसेंबर रोजी घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज सर्वधर्मीय नागरिकांनी ‘लाखांदूर बंद’ची हाक दिली. अवघ्या पाच वर्षीय मुलीवर १५ वर्षीय परप्रांतीयाकडून अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.