श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर हर्षदा पाटील याना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप वाडा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. याविरोधात आता काळ्या फिती लावून रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, जर दोषींवर कारवाई झाली नाही तर कामबंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.