जळगावात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा, किमान मासिक वेतन व मासिक पेन्शन लागू करा, या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.