जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा” मंचच्या वतीने धरणे आंदोलन छेडले. शालेय शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा अशी लेखी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातून पालक, संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.