प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 अंतर्गत नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सरण आंदोलन केलं. सोमवारी दिवसभर कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.